1 December

0
187

१ डिसेंबर – घटना

१८३५: हान्स क्रिस्चीयन अँडरसन च्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.

१९१७: कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.

१९४८: एस. एस. आपटे यांनी हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.

१९६३: नागालँड भारताचे १६ वे राज्य झाले.

१९६४: मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.

१९६५: भारतीय सीमा सुरक्षा दल (बोर्डर सिक्युरिटी फोर्से – बिएसएफ) ची स्थापना झाली.

१९७३: पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियाकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९७६: अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९८०: मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.

१९८१: AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.

१९९२: कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गदिमा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर.

१९९२: ज्यूडी लेदेन या ब्रिटिश महिलेने ३९७० मीटर (१३०२५ फूट) उंचीवरुन हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्‍चांक प्रस्थापित केला.

१९९३: प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय डी. लिट. पदवी जाहीर.

१९९९: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले.

२०००: नागालँड येथे दरवर्षी १ ते ७ डिसेंबर दरम्यान होर्निबल महोत्सव साजरा करण्याची सुरवात झाली.

२०१५: ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुझफ्फर हुसैन यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला.

१ डिसेंबर – जन्म

१०८१: फ्रान्सचा राजा लुई (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट ११३७)

१७६१: मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचा जन्म. (मृत्यू: १६ एप्रिल १८५०)

१८८५: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्यिक आचार्य काका कालेलकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९८१ – संनिधि आश्रम, नवी दिल्ली)

१९०९: मराठी नवकाव्याचे प्रणेते बाळ सीताराम मर्ढेकर उर्फ बी. सी. मर्ढेकर यांचा जन्म. (मृत्यू: २० मार्च १९५६)

१९११: पत्रकार, कथाकार, कवी आणि समीक्षक अनंत बाळकृष्ण अंतरकर यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९६६)

१९५०: भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक मंजू बन्सल यांचा जन्म.

१९५५: पार्श्वगायक उदित नारायण यांचा जन्म.

१९६०: भारतीय-इंग्रजी राजकीय शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक शिरिन एम. राय यांचा जन्म.

१९६३: श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांचा जन्म.

१९८०: भारतीय क्रिकेटपटू मोहोम्मद कैफ यांचा जन्म.

१ डिसेंबर – मृत्यु

११३५: इंग्लंडचा राजा हेन्री पहिला यांचे निधन.

१८६६: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १७९०)

१९७३: इस्रायल देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८८६)

१९८५: स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचे निधन. (जन्म: १८ जून १८९९)

१९८८: प्रा. गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचे निधन.

१९९०: राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १९००)