१ फेब्रुवारी – घटना
१६८९: गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.
१८३५: मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत.
१८८४: ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
१८९३: थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.
१९४१: डॉ. के. बी. लेले यांनी गुरुकिल्ली हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.
१९४६: नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.
१९५६: सुधी रंजन दास यांनी भारताचे ५वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६४: प्र. बा. गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.
१९७९: १५वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.
१९८१: ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.
१९९२: भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अॅंडरसन याला फरारी घोषित केले.
२००३: अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीर मृत्युमुखी.
२००४: मक्का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.
२०१३: जागतिक बुरखा/हिजाब दिनाची स्थापना करण्यात आली.
१ फेब्रुवारी – जन्म
१८६४: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)
१८८४: महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९८४)
१९०१: अमेरिकन अभिनेता क्लार्क गेबल यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६०)
१९१२: संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार राजा बढे यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९७७)
१९१७: चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट २०१२)
१९२७: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी २०१५ – सांगली)
१९२९: ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक जयंत साळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)
१९३१: रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष बोरिस येलत्सिन यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २००७)
१९६०: अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा जन्म.
१९७१: क्रिकेटपटू अजय जडेजा यांचा जन्म.
१९८२: पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा जन्म.
१ फेब्रुवारी – मृत्यू
१९७६: क्वांटम मॅकॅनिक्स मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वेर्नर हायसेनबर्ग यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९०१)
१९८१: डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे संस्थापक डोनाल्ड विल्स डग्लस सिनियर यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९२)
१९९५: नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर यांचे निधन. (मृत्यू: १० एप्रिल १९०७)
२००३: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९६१)
२०१२: संगीतकार व संगीत संयोजक अनिल मोहिले यांचे निधन.