1 January – दिनविशेष

0
274
जागतिक धूम्रपान विरोधी दिन

महत्त्वाच्या घटना

१७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.

१८०८: अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.

१८१८: भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला.

१८४२: बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले.

१८४८: महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.

१८६२: इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.

१८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.

१८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना.

१८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.

१९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.

१९०८: संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली.

१९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.

१९२३: चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.

१९३२: डॉ. नारायण परुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरु केले.

 

जन्म

६६२: पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १७२०)

१८७९: ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९७०)

१८९२: स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक महादेव देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२)

१८९४: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)

१९००: आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४)

१९०२: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१)

१९१८: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२)

१९२३: अभिनेत्री व गायिका उमा देवी खत्री उर्फ टुन टुन यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३)

१९२८: लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १९९८)

१९३६: साहित्यिक राजा राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९९७)

१९४१: चित्रपट कलाकार गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी यांचा जन्म.

१९४३: शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.

१९५०: भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका दीपा मेहता यांचा जन्म.

१९५१: अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म.

मृत्यू

१५१५: फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचे निधन. (जन्म: २७ जून १४६२)

१७४८: स्विस गणितज्ञ जोहान बर्नोली यांचे निधन.

१८९४: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)

१९४४: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १८६९)

१९५५: भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन.

१९७५: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १८९१)

१९८९: समाजवादी विचारवंत व पत्रकार दिनकर साक्रीकर यांचे निधन.

२००९: संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)