१० फेब्रुवारी – घटना
१९२३: टेक्सास टेकनॉलोजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना केली.
१९२९: जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.
१९३१: भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
१९३३: न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.
१९४८: पुणे विद्यापीठाची स्थापना.
१९४९: गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.
१९९६: आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या डीप ब्लू या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.
२००५: उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.
१० फेब्रुवारी – जन्म
१८०३: दानशूर व शिक्षणतज्ञ जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १८६५)
१८९४: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन यांचा जन्म. (मृत्यू: २९ डिसेंबर १९८६)
१९१०: साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ दुर्गा भागवत यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे २००२)
१९४५: केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून २०००)
१० फेब्रुवारी – मृत्यू
१८६५: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्रिक लेन्झ यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०४)
१९१२: निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १८२७)
१९२३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम राँटजेन यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १८४५)
१९८२: विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९३२)
२००१: जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९०४)
२०१२: एच. आर. एल. मॉरिसन चे संस्थापक लॉईड मॉरिसन यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९५७)