10 June

0
167

१० जून – घटना

१७६८: माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाला.

१९२४: इटलीच्या समाजवादी नेता ज्याकोमो मॅट्टेओटी यांची हत्या.

१९३५: अ‍ॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची स्थापना केली.

१९४०: दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९४०: दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.

१९४४: ओरादू-सुर-ग्लेनची कत्तल, स्त्री बालकांसह ६४२ व्यक्तींची हत्या.

१९७७: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा अ‍ॅपल-II हा संगणक बाजारात आला.

१९८२: पासून दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.

१९९९: उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती साठी निवड झाली.

२००३: स्पिरिटरोव्हर मंगळाकडे रवाना.

१० जून – जन्म

१२१३: पर्शियन तत्त्वज्ञ फख्रुद्दीन इराकी यांचा जन्म.

१९०६: गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९०९ – पोरबंदर, सौराष्ट्र, गुजरात)

१९०८: भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण जनरल जयंतीनाथ चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १९८३)

१९१६: डंचिन डोनट्स चे स्थापक विल्यम रोसेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २००२)

१९२४: नेत्रशल्यविशारद के. भालचंद्र यांचा जन्म.

१९३८: भारतीय उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म.

१९३८: भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक वासंती एन. भाट नायक यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००९)

१९५५: भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा जन्म.

१० जून – मृत्यू

१८३६: फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञआंद्रे अ‍ॅम्पिअर यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १७७५)

१९०३: इटालियन गणितज्ञ लुइ गीक्रेमॉना यांचे निधन.

१९०६: गुजराती लेखक समीक्षक गुलाब दासब्रोकर यांचे निधन.

१९५५: भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट यांचे निधन. (जन्म: १५ जून १८७८)

१९७६: पॅरामाउंट पिक्चर्स चे सहसंस्थापक अॅडॉल्फ झुकॉर यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १८७३)

२००१: सामाजिक कार्यकर्त्या फुलवंतीबाई झोडगे यांचे निधन.