१० मे – घटना
१८१८: इंग्रज व मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
१८२४: लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली.
१९०७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव लंडनमधे साजरा केला.
१९३७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.
१९४०: दुसरे महायुद्ध – हिटलरने हॉलंड, बेल्जिअम आणि फ्रान्सवर आक्रमण केले.
१९४०: दुसरे महायुद्ध – नेव्हिल चेम्बरलेनने राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
१९६२: मार्वल कॉमिक्सने द इक्रीडिबल हल्क या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित केला.
१९७९: मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले.
१९८१: फ्रान्सवा मितराँ फ्रान्सचे अध्यक्ष बनले.
१९९३: संतोष यादव हि दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.
१९९४: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली.
१९९७: ७.३ मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण मधील सुमारे १५६७ लोक ठार, २३०० लोक जखमी आणि ५०००० लोक बेघर झाले.
१० मे – जन्म
१२६५: जपानचा सम्राट फुशिमी यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १३१७)
१८५५: भारतीय गुरु आणि शिक्षक युकतेश्वर गिरी यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९३६)
१८८९: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार नारायण दामोदर सावरकर यांचा जन्म.
१९०५: गायक व संगीतकार पंकज मलिक यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९७८)
१९०९: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर चे पहिले संचालक बेल्लारी शामण्णा केशवन यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०००)
१९१४: चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १९९२)
१९१८: रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी २००२)
१९२७: भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांचा जन्म.
१९३१: ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर यांचा जन्म.
१९३७: आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा माणिक गोडघाटे यांचा जन्म.
१९४०: प्रसिद्धी पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च २०१२)
१९८६: बुद्धीबळपटू पेंड्याला हरिकृष्ण यांचा जन्म.
१० मे – मृत्यू
१७७४: फ्रान्सचा राजा लुई (पंधरावा) यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १७१०)
१८९९: रँड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल महादेव विनायक रानडे यांना फाशी.
१९८१: विनोदी लेखक प्राध्यापक विमादि तथा विनायक माधव दीक्षित पटवर्धन यांचे निधन.
१९९८: पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२)
२०००: कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९०९)
२००१: महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल सुधाकरराव नाईक यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९३४)
२००२: गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १९१९)
२०१५: भारतीय इतिहासकार, लेखक निनाद बेडेकर यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १९४९)