१२ मार्च – घटना
१८९४: कोका-कोला बाटली मध्ये भरून विक्रीस सुरवात.
१९११: कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला.
१९१८: रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.
१९३०: महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
१९६८: मॉरिशस इंग्लंडपासून स्वतंत्र झाला.
१९९१: जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी.
१९९२: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.
१९९३: मुंबई येथे १२ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार झाले, तर हजारो जखमी झाले.
१९९९: सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.
१९९९: चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड नाटो (NATO) मधे सामील झाले.
२००१: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१२ मार्च – जन्म
१८२४: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव किरचॉफ यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १८८७)
१८९१: अभिनेते आणि निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म.
१९११: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा जन्म. (जन्म: १२ ऑगस्ट १९७३)
१९१३: भारताचे ५वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९८४)
१९३३: लेखिका कविता विश्वनाथ नरवणे यांचा जन्म.
१९३१: साउथवेस्ट एअरलाईन्स चे सहसंस्थापक हर्ब केलेहर यांचा जन्म.
१९८४: प्रसिध्द पार्श्वगायिका श्रेया घोशाल यांचा जन्म.
१२ मार्च – मृत्यू
१९४२: जर्मन अभियंते आणि उद्योजक रॉबर्ट बॉश यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १८६१)
१९६०: भारतीय इतिहासकार क्षितीमोहन सेन यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १८८०)
१९९९: प्रसिध्द व्हायोलिनवादक आणि वाद्यवृंद संचालक यहुदी मेनुहिन यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९१६)
२००१: अमेरिकन लेखक रॉबर्ट लुडलुम यांचे निधन. (जन्म: २५ मे १९२७)