13 June
१३ जून- घटना
१८८१: यू. एस. एस. जीनेट आर्क्टिक समुद्रात नष्ट.
१८८६: कॅनडातील व्हॅनकूवर शहर आगीत बेचिराख.
१९३४: व्हेनिसमध्ये अॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची भेट.
१९५६: पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.
१९७८: इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली.
१९८३: पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
१९९७: दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे १०० जण जखमी झाले.
२०००: स्पेन मधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला.
१३ जून – जन्म
१८२२: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८९४)
१८३१: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ जेम्सक्लार्क मॅक्सवेल यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १८७९ – केम्ब्रिज, यु. के.)
१८७९: कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९४५)
१९०५: इंग्लंडचे क्रिकेटपटू कुमार श्री दुलीपसिंहजी यांचा जन्म., यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५९ – मुंबई)
१९०९: केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९९८)
१९२३: गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे २००१ – मुंबई)
१९३७: द इंडिपेंडंट चे सहसंस्थापक आंद्रेस व्हिटॅम स्मिथ यांचा जन्म.
१९६५: भारतीय क्रिकेटपटू मनिंदर सिंग यांचा जन्म.
१३ जून – मृत्यू
१९६७: भारतीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १८९१)
१९६९: विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १८९८)
२०१२: पाकिस्तानी गझल गायक मेहंदी हसन यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९२७)
२०१३: ड्यूईश इंक. कंपनी चे संस्थापक डेव्हिड ड्यूईश यांचे निधन.