१३ सप्टेंबर – घटना
१८९८: हॅनीबल गुडविन यांनी सेल्यूलॉइड फोटोग्राफिक फिल्म चे पेटंट घेतले.
१९२२: लिबियातील अझिजिया येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
१९४८: ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.
१९८५: सुपर मारियो गेम जपान मध्ये प्रकाशित झाला.
१९८९: आर्च बिशप डेस्मंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण अाफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.
१९९६: श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुमती पारिख यांना दिला.
२००३: ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
२००३: मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
२००८: दिल्लीतील बॉम्बस्फोटांत ३० ठार, १३० जण जखमी झाले.
१३ सप्टेंबर – जन्म
१८५२: नामाकिंत शिक्षक, संस्कृत पंडित गणेश जनार्दन आगाशे यांचा जन्म.
१८५७: द हर्शे चॉकलेट कंपनीचे संस्थापक मिल्टन हर्शे यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९४५)
१८६५: भारतीय-इंग्रजी फील्ड मार्शल विल्यम बर्डवुड यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १९५१)
१८८६: नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतिज रंग व अल्कलॉइड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायन शास्त्रज्ञ सर रॉबर्ट रॉबिन्सन यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७५)
१८९०: मोनाको ग्रांप्री चे संस्थापक अँटोनी नोगेस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९७८)
१९३२: शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्म.
१९६७: अमेरिकन धावपटू मायकेल जॉन्सन यांचा जन्म.
१९६९: ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्न यांचा जन्म.
१९७१: क्रोएशियाचा लॉन टेनिसखेळाडू गोरान इव्हानिसेव्हिच यांचा जन्म.
१९७६: न्झीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू क्रेग मॅकमिलन यांचा जन्म.
१९८०: भारतीय हॉकी खेळाडू वीरेन रास्किन्हा यांचा जन्म.
१३ सप्टेंबर – मृत्यू
८१: रोमन सम्राट टायटस यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर ३९)
१८९३: पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १८३८)
१९२८: सुप्रिसद्ध हिंदी कवी श्रीधर पाठक यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८५८)
१९२९: क्रांतिकारक जतीनद्र दास यांचे तुरुंगातील जुलमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात ६३ व्या दिवशी निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९०४)
१९७१: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते केशवराव त्र्यंबक दाते यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८८९ – अडिवरे, रत्नागिरी, महाराष्ट्र)
१९७३: भारतीय कवी आणि तत्त्ववेक्षक सज्जाद झहिर यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९०५)
१९७५: भारतीय गायक आणि संगीतज्ञ मुदिकॉन्दाम वेंकटरम अय्यर यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १८९७)
१९९५: प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश्वर नियोग यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१५ – कमरफादिया, शिवसागर, आसाम)
१९९७: प्रसिद्ध गीतकार लालजी पांडेय तथा अंजान यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १९३०)
२००४: गर्भनिरोधक गोळी चे संशोधक लुइस ई. मिरमोंटेस यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९२५)
२०१२: भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९२६)