14 December

0
169

१४ डिसेंबर – घटना

१८१९: अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.

१८९६: ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.

१९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला.

१९२९: प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९३९: फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले.

१९४१: दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.

१९६१: टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१४ डिसेंबर – जन्म

१५०३: प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता नोट्रे डॅम (Nostradamus) यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १५६६)

१५४६: डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १६०१)

१८९५: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२)

१९१८: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१४)

१९२४: अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९८८)

१९२८: गायक व नट प्रसाद सावकार यांचा जन्म.

१९३४: चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक श्याम बेनेगल यांचा जन्म.

१९३९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)

१९४६: राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९८०)

१९५३: भारतीय लॉनटेनिसपटू विजय अमृतराज यांचा जन्म.

१९८४: भारतीय अभिनेते आणि निर्माते राणा दग्गुबटी यांचा जन्म.

१४ डिसेंबर – मृत्यू

१७९९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)

१९४३: कॉर्नफ्लेक्सचे निर्माते जॉन हार्वे केलॉग यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८५२)

१९६६: गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेन्द्र यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९२३)

१९७७: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)

२००६: अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक अत्लम एर्टेगुन यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९२३)

२०१३: भारतीय चित्रकार सी एन करुणाकरन यांचे निधन.