14 July

0
169

१४ जुलै – घटना

१७८९: पॅरिस मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहूर्तमेढ होती.

१८६७: आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.

१९५८: इराक मध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.

१९६०: चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. ४५ वर्षे त्यांनी संशोधन केले.

१९६९: अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.

१९७६: कॅनडात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.

२००३: जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.

२०१३: डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली.

१४ जुलै – जन्म

१८५६: थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा टेंभू कराड येथे जन्म. (मृत्यू: १७ जून १८९५)

१८६२: ऑस्ट्रियन चित्रकार गुस्टाफ क्लिम्ट यांचा जन्म.

१८८४: महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७०)

१८९३: भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९५२)

१९१०: टॉम अँड जेरीची चित्रे काढणारा चित्रकार विल्यम हॅना यांचा जन्म.

१९१७: संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६७)

१९२०: केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)

१९४७: मॉरिशसचे तिसरे व सहावे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांचा जन्म.

१९६७: श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि राजकारणी हशन तिलकरत्ने यांचा जन्म.

१४ जुलै – मृत्यू

१९०४: दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी पॉल क्रुगर यांचे निधन.

१९३६: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८९०)

१९६३: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १८८७)

१९७५: संगीतकार मदनमोहन यांचे निधन. (जन्म: २५ जून १९२४)

१९९३: करवीर संस्थानच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणीसाहेब यांचे निधन.

१९९८: मॅकडॉनल्ड चे सहसंस्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १९०९)

२००३: हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १९०९)

२००३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९२२)

२००८: सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९२०)