15 August

0
148

१५ ऑगस्ट – घटना

१५१९: पनामा सिटी शहराची स्थापना झाली.

१६६४: कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसर्‍यांदा) पराभूत केले.

१८२४: अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.

१८६२: मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

१९१४: पनामा कालव्यातून एस. एस. अ‍ॅनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले.

१९२९: ग्राफ झेपेलिन हा संशोधक बलून मधून जगप्रवासासाठी रवाना झाले.

१९४५: दुसरे महायुद्ध – जपानने शरणागती पत्करली.

१९४७: भारत देश स्वतंत्र झाला.

१९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.

१९४७: पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.

१९४८: दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.

१९६०: कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.

१९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.

१९७१: बहरैन देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९७५: बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.

१९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.

१९८८: मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.

१५ ऑगस्ट – जन्म

१७६९: फ्रान्सचा सम्राट नेपोलिअन बोनापार्ट यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे १८२१ – सेंट हेलेना)

१७९८: भारतीय योद्धा संगोली रायन्ना यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८३१)

१८६५: रेकी चे निर्माते मिकाओ उस्ईई यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९२६)

१८६७: रंगभूमी अभिनेते गणपतराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९२२)

१८७२: क्रांतिकारक, तत्त्वचिंतक योगी अरविंद घोष यांचा जन्म.

१८७२: भारतीय गुरु, कवी आणि तत्वज्ञ श्री अरबिंदो यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५०)

१८७३: भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार रामप्रसाद चंदा यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४२)

१९०४: मोटार व्हीलचेअर चे शोधक जॉर्ज क्लाईन यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९२२)

१९१२: इंदौर घराण्याचे संस्थापक उस्ताद अमीर खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९७४)

१९१३: लेखक कवी भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ बी. रघुनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९५३)

१९१५: ऊर्दू कथा, पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९९१)

१९१७: लेखिका अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर २००१)

१९२२: लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म.

१९२९: साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक उमाकांत ठोमरे यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९९९)

१९४५: बांगला देशच्या पंतप्रधान बेगम खालेदा झिया यांचा जन्म.

१९४७: चित्रपट अभिनेत्री राखी गुलझार यांचा जन्म.

१९५८: अभिनेत्री आणि वेशभूषाकार सिंपल कपाडिया यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर २००९)

१९६१: भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक सुहासिनी मणिरत्नम यांचा जन्म.

१९६४: बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन च्या सह-संस्थापिका आणि बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांचा जन्म.

१९७१: भारतीय गायक आणि संगीतकार अदनान सामी यांचा जन्म.

१९७५: भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक विजय भारद्वाज यांचा जन्म.

१९९२: भारतीय बुद्धिबळपटू भास्करन आडहान यांचा जन्म.

१५ ऑगस्ट – मृत्यू

१०५७: स्कॉटलंडचा राजा मॅक बेथ यांचे निधन.

१११८: कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट ऍलेक्सियस (पहिला) यांचे निधन.

१९३५: अमेरिकन अभिनेते विल रॉजर्स यांचे निधन.

१९४२: स्वातंत्र्य सेनानी, म. गांधींचे स्वीस सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८९२)

१९७४: स्वामी स्वरुपानंद यांनी समाधी घेतली (जन्म: १५ डिसेंबर १९०३)

१९७५: बांगला देशचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९२०)

२००४: गुजरातचे मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९४१)

२००५: भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२७)