16 June

0
140

१६ जून – घटना

१९०३: फोर्ड मोटर कंपनीची सुरवात झाली.

१९११: न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग (आय. बी. एम.) कंपनीची स्थापना.

१९१४: सहा वर्षांच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका.

१९४७: नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.

१९६३: व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा अंतराळ प्रवास करणारी पहिली महिला अंतराळयात्री बनली.

१९९०: मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.

२०१०: तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला.

१६ जून – जन्म

१७२३: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अ‍ॅडम स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १७९०)

१९२०: गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८९)

१९३६: प्रसिद्ध ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ शहरयार यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी २०१२)

१९५०: भारतीय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म.

१९६८: आम आदमी पार्टी चे संस्थापक, समाजसेवक व सनदी अधिकारी अरविंद केजरीवाल यांचा जन्म.

१९९४: गायिका आर्या आंबेकर यांचा जन्म.

१६ जून – मृत्यू

१८६९: भारतीय-इंग्रजी वनस्पतीशास्त्रज्ञ व संशोधक चार्ल्स स्टर्ट यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १७९५)

१९२५: बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी देशबंधू चित्तरंजन दास यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १८७०)

१९३०: गॅरोकोम्पास चे सहसंशोधक एल्मर अॅम्ब्रोज स्पीरी यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८६०)

१९४४: भारतीय रसायनशास्त्रज्ञ मास्टर ऑफ नायट्रेटस उर्फ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८६१)

१९७१: बीबीसी चे सह-संस्थापक जॉन रीथ यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८८९)

१९७७: मराठी रंगभूमीवरील गायक-नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९१२)

१९९५: मंगेशकरांच्या मातोश्री शुद्धमतीतथा माई मंगेशकर यांचे निधन.