१७ एप्रिल – घटना – दिनविशेष
१९४१: दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९४६: सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.
१९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.
१९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
१९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
१९७५: ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.
२००१: अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम – आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१७ एप्रिल – जन्म – दिनविशेष
१४७८: हिंदी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास यांचा जन्म.
१८२०: बेसबॉल चे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १८९२)
१८३७: अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९१३)
१८९१: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९७३)
१८९७: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८१)
१९१६: जगातील पहिल्या महिला पंतप्रधान तर श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०००)
१९५१: चित्रपट अभिनेत्री बिंदूयांचा जन्म.
१९६१: बिलियर्डसपटू गीतसेठी यांचा जन्म.
१९७२: श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांचा जन्म.
१९७७: भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांचा जन्म.
१७ एप्रिल – मृत्यू – दिनविशेष
१७९०: अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलिन यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १७०६)
१८८२: फ्लश टॉयलेट चे शोधक जॉर्ज जेनिंग्स यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८१०)
१९४६: भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १८६९)
१९७५: भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८८८)
१९९७: ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री बिजू पटनायक यांचे निधन. (जन्म: ५ मार्च
१९१६)
१९९८: चित्रपट निर्माते विजय सिप्पी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू.
२००१: वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक डॉ. वा. द. वर्तक यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९२५)
२००४: कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सौंदर्या यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९७२)
२०११: विनोदी साहित्यिक वि.आ. बुवा यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १९२६)
२०१२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महापात्रा यांचे निधन. (जन्म: १७ जुन १ ९१२)