19 December

0
174

१९ डिसेंबर – घटना

१९२७: राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.

१९४१: दुसरे महायुद्ध – अ‍ॅडॉल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती बनले.

१९६१: पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.

१९६३: झांजिबारला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.

१९८३: ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन फिफा वर्ल्ड कप चोरीस गेला.

२००२: व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९ डिसेंबर – जन्म

१८५२: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९३१)

१८९४: पद्मभूषण व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती कस्तुरभाई लालभाई यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९८०)

१८९९: मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंग यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९८४)

१९०६: रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव्ह यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९८२)

१९१९: चरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ओमप्रकाश यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९१९)

१९३४: भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा जन्म.

१९६६: भारतीय क्रिकेटपटू राजेश चौहान यांचा जन्म.

१९६९: भारतीय क्रिकेटपटू नयन मोंगिया यांचा जन्म.

१९७४: ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज रिकी पॉन्टिंग यांचा जन्म.

१९ डिसेंबर – मृत्यू

१८४८: इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचे निधन. (जन्म: ३० जुलै १८१८)

१८६०: भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १८१२)

१९१५: जर्मन मेंदुविकारतज्ञ अलॉइस अल्झायमर यांचे निधन. (जन्म: १४ जून १८६४)

१९२७: क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल यांचे निधन. (जन्म: ११ जून १८९७)

१९२७: क्रांतिकारक अश्फाक़ुला खान यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९००)

१९९७: स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेन्द्र बारलिंगे यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९१९)

१९९७: सोनीचे सहसंस्थापक मासारू इबकू यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०८)

१९९८: भावगीतगायक जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे यांचे निधन.

१९९९: रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी यांचे निधन. (जन्म: २४ मे १९३३)

२०१४: भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक एस. बालसुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९३५)