19 February

0
167

१९ फेब्रुवारी – घटना

१८७८: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचे पेटंट घेतले.
१८८४: यू. एस. ए. च्या दक्षिण भागाला ६० चक्रीवादळांनी तडाखा दिला.
१९४२: पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझव्हेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या.
२००३: तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

 

१९ फेब्रुवारी – जन्म

१४७३: सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १५४३)
१६३०: छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)
१८५९: स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज स्वांते अर्‍हेनिअस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९२७)
१८९९: गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बळवंतराय मेहता यांचा जन्म.
१९०६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्म. (मृत्यू: ५ जून १९७३)
१९१९: मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९९२)
१९२२: पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९९५)
१९६२: झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू हॅना मंडलिकोव्हा यांचा जन्म.

 

१९ फेब्रुवारी – मृत्यू

१८१८: पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे आष्टी येथे निधन.
१९१५: थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन. (जन्म: ९ मे १८६६)
१९५६: प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य नरेन्द्र देव यांचे निधन.
१९५६: ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत केशव लक्ष्मण दफ्तरी यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८८०)
१९७८: गायक व संगीतकार पंकज मलिक यांचे निधन. (जन्म: १० मे १९०५)
१९९७: संगीतकार राम कदम यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९१८)
१९९७: सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९०४)
२००३: पौराणिक हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते अनंत मराठे यांचे निधन.