19 September

0
172

१९ सप्टेंबर – घटना

१८९३: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.

१९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.

१९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील डिस्‍नेलँड ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.

१९८३: सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.

२०००: सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.

२००१: गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर.

२००७: टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.

१९ सप्टेंबर – जन्म

१५५१: फ्रान्सचा राजा हेन्‍री (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १५८९)

१८६७: चित्रकार, संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९६८)

१९११: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९९३)

१९१२: भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक रुबेन डेव्हीड यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९८९)

१९१७: कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९८)

१९२५: निर्माते व नाटककार बाबूराव गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९८१)

१९५८: गायक, अभिनेता व गीतलेखक लकी अली यांचा जन्म.

१९६५: भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांचा क्लीव्हलँड ओहायो अमेरिका येथे जन्म.

१९७७: भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांचा जन्म.

१९ सप्टेंबर – मृत्यू

१७१०: डॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर यांचे निधन.

१७२६: छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक खंडो बल्लाळ चिटणीस यांचे निधन.

१८८१: अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८३१)

१९२५: इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन यांचे निधन.

१९३६: हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८६०)

१९६३: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १८९१ – ड्युनेडिन, न्यूझीलंड)

१९८७: नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान एनर गेरहर्देसन यांचे निधन. (जन्म: १० मे १८९७)

१९९२: साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष ना. रा. शेंडे यांचे निधन.

१९९३: म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी दिनशा के. मेहता यांचे निधन.

२००२: रंगभूमी व चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९५४)

२००४: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९२८)

२००७: मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९१७)