2 November

0
178

२ नोव्हेंबर – घटना

१९१४: रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.

१९३६: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बीबीसी टेलिव्हिजन सेवा सुरू केली.

१९३६: कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना झाली.

१९४०: दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.

१९५३: पाकिस्तानातील असेंब्लीने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठवले.

१९९९: दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड.

२ नोव्हेंबर – जन्म

१४७०: इंग्लंडचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (पाचवा)

१७५५: फ्रेन्च सम्राज्ञी मेरी आंत्वानेत यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १७९३)

१८३३: होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे सहसंस्थापक महेन्द्र लाल सरकार यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९०४ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)

१८८२: महाराष्ट्रातील जादुगारांचे आचार्य डॉ.के.बी.लेले यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९६३)

१८८६: बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९७१)

१८९७: दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, सोहराब मेहेरबानजी मोदी यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९८४)

१९२१: ध्वनिमुद्रणतज्ञ रघुवीर दाते यांचा जन्म.

१९२९: बोस कॉर्पोरेशन चे संस्थापक अमर बोस यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २०१३)

१९४१: केन्द्रीय मंत्री व पत्रकार अरुण शौरी यांचा जन्म.

१९६०: संगीतकार अनु मलिक यांचा जन्म.

१९६५: अभिनेता व निर्माता शाहरुख खान यांचा जन्म.

२ नोव्हेंबर – मृत्यू

१८८५: मराठीतले पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार, नट, दिग्दर्शक बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे गुर्लहोसूर यांचे निधन.

१९५०: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८५६)

१९५४: ग्रीक साहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक, संपादक प्रा.गोपाळ विष्णु तुळपुळे यांचे निधन.

१९८४: मराठी साहित्यिक शरद्चंद्र मुक्तिबोध यांचे निधन.

१९९०: गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९०३)

२०१२: तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचे निधन. (जन्म: २३ फेब्रुवारी १९५७)

२०१२: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९३०)