२ सप्टेंबर – घटना
१९१६: पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
१९२०: म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
१९४५: व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
१९४६: भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
१९६०: केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
१९९९: भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.
२ सप्टेंबर – जन्म
१८३८: भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुन १९१४)
१८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ विल्हेल्म ऑस्टवाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९५६)
१८७७: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ फेडरिक सॉडी यांचा जन्म.
१८८६: साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव माटे तथा श्री. म. माटे यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९५७)
१९२४: केनिया देशाचे राष्ट्राध्यक्ष डॅनियेल अराप मोई यांचा जन्म.
१९३२: स्नॅपल चे संस्थापक अर्नोल्ड ग्रीनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर २०१२)
१९४१: चित्रपट अभिनेत्री साधना शिवदासानी ऊर्फ साधना यांचा जन्म.
१९५२: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिमी कॉनर्स यांचा जन्म.
१९५३: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २००१)
१९६५: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक पार्थो सेन गुप्ता यांचा जन्म.
१९७१: भारतीय अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांचा जन्म.
१९८८: भारतीय क्रिकेट खेळाडू इशांत शर्मा यांचा जन्म.
१९८८: भारतीय गायक इश्मीत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००८)
२ सप्टेंबर – मृत्यू
१५४०: इथियोपियाचा सम्राट दावित (दुसरा) यांचे निधन.
१८६५: आयरिश गणितज्ञ विल्यम रोवन हॅमिल्टन यांचे निधन.
१९३७: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती चे स्थापक पियरे डी कौर्तिन यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८६३)
१९६०: वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे निधन.
१९६९: व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह यांचे निधन. (जन्म: १९ मे १८९०)
१९७६: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार वि. स. खांडेकर यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८९८)
१९९०: मराठवाड्याचा चालताबोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक न. शे. पोहनेरकर यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०७)
१९९९: चित्रकार व लेखक डी. डी. रेगे यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९११ – पाचल, राजापूर, रत्नागिरी)
२००९: आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: ८ जुलै १९४९)
२०११: संगीतकार श्रीनिवास खळे यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९२६)
२०१४: भारतीय वकील आणि राजकारणी गोपाल निमाजी वाहनवती यांचे निधन. (जन्म: ७ मे १९४९)