२० मे – घटना
५२६: सिरीया आणि अँटोचियात झालेल्या एका भूकंपात सुमारे ३,००,००० लोकांचा मृत्यू.
१४९८: पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा हे भारताच्या कालिकत (कलकत्ता) बंदरात दाखल झाले.
१५४०: छायाचित्रकार अब्राहम ऑरटेलियस यांनी थॅट्रम ऑरबिस टेरारम हा पहिला आधुनिक अॅटलास प्रकाशित केला.
१८७३: लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणे असलेल्या निळ्या जीन्स चे पेटंट घेतले.
१८९१: थॉमस एडीसन यांनी किनेटोस्कोप चे पहिला प्रोटोटाइप प्रदर्शित केले
१९०२: क्यूबा देश अमेरिकेपासून स्वातंत्र्य झाला.
१९४८: चिआंग काई शेक चीन गणराज्यचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
१९९६: देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द’इयर हा पुरस्कार जाहीर.
२०००: राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती जी. एम. सी. बालयोगी यांची एकमताने निवड झाली.
२००१: चित्रपट निर्माते व लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर.
२० मे – जन्म
१८१८: अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनी चे सहसंस्थापक विल्यम फार्गो यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १८८१)
१८५०: केसरी चे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १८८२)
१८५१: ग्रामोफोन रेकॉर्ड चे शोधक एमिल बर्लिनर यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९२९)
१८६०: आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९१७)
१८८४: प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९२२)
१९००: छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी सुमित्रानंदन पंत यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर १९७७)
१९१३: हेव्हलेट-पॅकार्ड चे सहसंस्थापक विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी २००१)
१९१५: इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख मोशे दायान यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९८१)
१९४४: रेड बुल चे सहसंस्थापक डीट्रिख मत्थेकित्झ यांचा जन्म.
१९५२: कॅमेरुनचा फूटबॉलपटू रॉजर मिला यांचा जन्म.
२० मे – मृत्यू
१५०६: इटालियन दर्यावर्दी व संशोधक ख्रिस्तोफर कोलंबस यांचे निधन.
१५७१: राघवचैतन्यांचे विख्यात शिष्य व संत तुकारामांचे गुरु, केशवचैतन्य ऊर्फ बाबाचैतन्य यांनी जुन्नरजवळील ओतूर येथे समाधी घेतली.
१७६६: इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १६९३)
१८७८: समाजसुधारक व संस्कृत विद्वान कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे निधन.
१९३२: लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८५८)
१९६१: कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते भाई विष्णूपंत चितळे यांचे निधन.
१९९२: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगांवकर यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९१६)
१९९४: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के. ब्रम्हानंद रेड्डी यांचे निधन. (जन्म: २८ जुलै १९०९)
१९९७: इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील विश्वकर्मा माणिकराव लोटलीकर यांचे निधन.
२०१२: भारतीय मानववंशशास्त्रज्ञ लीला दुबे यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १९२३)
२०१२: रिमोट कंट्रोल चे शोधक यूजीन पॉली यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९१५)