20 September

0
162

२० सप्टेंबर – घटना

१६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.

१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.

१९१३: वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.

१९४६: पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.

१९७३: टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरुषाचा लॉन टेनिस मध्ये पराभव केला.

१९७७: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

२००१: अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले.

२० सप्टेंबर – जन्म

१८५३: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१०)

१८९७: मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९७३)

१९०९: गुजराती लेखक व समीक्षक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म.

१९११: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचा जन्म (मृत्यू: २ जून १९९०)

१९१३: कवी वा. रा. कांत यांचा जन्म.

१९२१: क्रिकेटपटू पनानमल पंजाबी यांचा जन्म.

१९२२: चरीत्र वाङ्मयाचे संशोधक द. ना. गोखले यांचा जन्म.

१९२३: भारतीय अभिनेते आणि निर्माते अक्किनेनी नागेश्वर राव यांचा जन्म (मृत्यू: २२ जानेवारी २०१४)

१९२५: थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचा जन्म (मृत्यू: ९ जून १९४६)

१९३४: इटालियन चित्रपट अभिनेत्री सोफिया लाॅरेन यांचा जन्म.

१९३४: भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार राजिंदर पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)

१९४४: क्रिकेटपटू रमेश सक्सेना यांचा जन्म.

१९४६: भारतीय वकील आणि न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचा जन्म.

१९४९: चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्म.

१९०९: गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १९०६ – पुणे)

२० सप्टेंबर – मृत्यू

१८१०: ऊर्दू शायर मीर तकी मीर यांचे निधन.

१९१५: विदर्भातील सतपुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण. (जन्म: ६ जुलै १८८१)

१९२८: केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन.

१९३३: विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक अ‍ॅनी बेझंट यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १८४७)

१९७९: चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष लुडविक स्वोबोदा यांचे निधन.

१९९६: कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत दगडू मारुती पवार उर्फ दया यांचे निधन.

१९९७: चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचे निधन. (मृत्यू: ९ जानेवारी १९२६ – खांडवा, मध्य प्रदेश)

२०१५: भारतीय उद्योजक जगमोहन दालमिया यांचे निधन. (जन्म: ३० मे १९४०)