21 May

0
178

२१ मे – घटना

१८८१: वॉशिंग्टन (डी. सी.) येथे अमेरिकन रेड क्रॉस ची स्थापना झाली.
१९०४: पॅरिसमध्ये फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) ची स्थापना झाली.
१९२७: चार्ल्स लिंडबर्ग यांनी एकट्याने जगातील पहिले न थांबता अटलांटिक महासागर पार करणारे उड्डाण पूर्ण केले.
१९३२: अमेलिया इअरहार्ट ह्या अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
१९९१: पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे आत्मघातकी पथकाने हत्या केली.
१९९२: चीनने १,००० किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.
१९९४: ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.
१९९६: सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.

२१ मे – जन्म

१९१६: अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९७)
१९२३: स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट २००३)
१९२८: कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)
१९३१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९१)
१९५६: अभिनेता रविन्र्द मंकणी यांचा जन्म.
१९५८: भारतीय-अमेरिकन फॅशन डिझायनर नइम खान यांचा जन्म.
१९६०: दक्षिण भारतीय अभिनेता मोहनलाल यांचा जन्म.

२१ मे – मृत्यू

१४७१: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सहावा) यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १४२१)
१६८६: वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १६०२)
१९७९: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १८९३)
१९९१: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या. (जन्म: २० ऑगस्ट १९४४)
१९९८: इंटकचे सोलापुरातील नेते आबासाहेब बाबूराव किल्लेदार यांचे निधन.
२०००: हर्बालाइफ कंपनी चे स्थापक मार्क आर. ह्यूजेस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९५६)