२२ जुलै – घटना
१९०८: देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.
१९३१: फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला.
१९३३: विली पोस्ट या वैमानिकाने ७ दिवस १८ तास ४९ मिनिटे या विक्रमी वेळेत विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
१९४२: वॉर्सा मधुन ज्यूंना हद्दपार करणे सुरू झाले.
१९४४: पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.
१९४६: इर्गुनया दहशतवादी संघटनेने जेरुसलेम मधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्ब हल्ला केला. त्यात ९० ठार.
१९७७: चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.
१९९३: वेषभूषाकार भानू अथैय्या यांना अमेरिकेतील अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्त्व देण्यात आले.
२००१: जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा जलतरणपटू इयान थॉर्प याने ४०० मीटर फ्रीस्टाइल शर्यत ३ मि. ४०.१७ सेकंदांत जिंकली.
२२ जुलै – जन्म
१८८७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्तावलुडविग हर्ट्झ यांचा जन्म.
१८९८: शास्त्रीय गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५)
१९१५: भारतीय-पाकिस्तानी राजकारणी आणि राजनयिक शैस्ता सुहरावर्दी इकामुल्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २०००)
१९२३: हिंदी चित्रपट पार्श्वगायक मुकेश चंदमाथूर तथा मुकेश यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७६)
१९२५: पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक लेखक गोविंद तळवलकर यांचा जन्म.
१९३७: मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर २०११)
१९७०: महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म.
१९९२: अमेरिकन गायक व अभिनेत्री सेलेना गोमेझ यांचा जन्म.
२२ जुलै – मृत्यू
१५४०: हंगेरीचा राजा जॉन झापोल्या यांचे निधन.
१८२६: इटालियन खगोलशास्त्रज्ञ ज्युसेप्पे पियाझी यांचे निधन.
१९१८: पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इंदरलाल रॉय यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १८९८)
१९८४: साहित्यिक आणि प्रकाशक गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ यांचे निधन.
१९९५: इंग्लिश क्रिकेटपटू हेरॉल्ड लारवूड यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९०४)
२००३: सद्दाम हुसेन यांचा मुलगा उदय हुसेन यांचे निधन. (जन्म: १८ जून १९६५)
२००३: सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसय हुसेन यांचे निधन. (जन्म: १७ मे १९६६)