22 November

0
180

२२ नोव्हेंबर – घटना

१८५८: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना.

१९४३: लेबनॉन फ्रान्सपासुन स्वतंत्र झाला.

१९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा.

१९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन.

१९६३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.

१९६८: द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.

१९८६: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.

१९९१: डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू.

१९९७: नायजेरियात मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार.

२००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.

२०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.

२२ नोव्हेंबर – जन्म

१८०८: पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १८९२)

१८७७: एफ.सी. बार्सिलोनाचे संस्थापक जोन गॅम्पर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९३०)

१८८०: धर्मरहस्यकार केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९५६)

१८८५: पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९५१)

१८९०: फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७०)

१९०९: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार द. शं. तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८)

१९१३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. लक्ष्मीकांत झा यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९८८ – पुणे)

१९१५: चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८०)

१९२२: साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा जन्म.

१९२६: मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक आर्थर जोन्स यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००७)

१९३९: उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म.

१९४३: अमेरिकन लॉनटेनिस पटू बिली जीन किंग यांचा जन्म.

१९६७: टेनिसपटू बोरिस बेकर यांचा जन्म.

१९६८: पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म.

१९७०: श्रीलंकेचा क्रिकेट कर्णधार मार्वन अट्टापट्टू यांचा जन्म.

१९८०: नेपस्टरचे संस्थापक शॉन फॅनिंग यांचा जन्म.

२२ नोव्हेंबर – मृत्यु

१९०२: जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रूप्प यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४)

१९२०: कवी व संपादक एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचे निधन.

१९४४: खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिग्टन यांचे निधन.

१९५७: नाट्यकर्मी पार्श्वनाथ आळतेकर यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १८९७)

१९६३: इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४)

१९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. (जन्म: २९ मे १९१७)

१९८०: हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती मे वेस्ट यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १८९३)

२०००: अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१२)

२००२: हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन.

२००८: गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९३९)

२०१२: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचे निधन. (जन्म: २३ मे १९२६)

२०१६: भारतीय गायक एम. बालमुलकृष्ण यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९३०)