22 October

0
170

२२ ऑक्टोबर – घटना

४००४ ई. पू.: उस्शेर कालक्रमानुसार सुमारे संध्याकाळी सहा वाजता जग तयार केले गेले.

१६३३: लियाओउलू उपसागाराची लढाई: मिंग राजघराण्याने डच ईस्ट इंडिया कंपनीला पराभूत केले.

१७९७: बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.

१९२७: निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.

१९३८: चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.

१९६३: पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.

१९६४: फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.

१९९४: भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर.

२००१: ग्रँड थेफ्ट ऑटो ३ हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.

२००८: भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-१ चे प्रक्षेपण केले.

२२ ऑक्टोबर – जन्म

१६८९: पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १७५०)

१८७३: अमृतानुभवी संत तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ स्वामी रामतीर्थ यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १९०६)

१९००: भारतीय स्वातंत्र्यसैनिक अश्फाक़ुला खान यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)

१९४२: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघूवीर सिंह यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९९९ – न्यूयॉर्क)

१९४७: भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक दीपक चोप्रा यांचा जन्म.

१९४८: इंग्लंडचा गोलंदाज माईक हेंड्रिक यांचा जन्म.

१९८८: भारतीय अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा जन्म.

२२ ऑक्टोबर – मृत्यू

१९१७: इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक चार्ल्स पार्डे ल्यूकिस यांचे निधन.

१९३३: थोर देशभक्त बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८७१)

१९७८: साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८९४)

१९९१: देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक ग. म. सोहोनी यांचे निधन.

१९९८: हिंदी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १९२२)

२०००: अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती अशोक मोतीलाल फिरोदिया यांचे निधन.

२०१४: भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचे निधन.