२३ डिसेंबर – घटना
१८९३: हॅन्सेल अॅंड ग्रेटेल या प्रसिद्ध सांगितिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला.
१९१४: पहिले विश्वयुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो इजिप्त येथे आगमन.
१९४०: वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
१९४७: अमेरिकेतील बेल रिसर्च लॅब्ज या संशोधन संस्थेने ट्रॅन्झिस्टर या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली.
१९५४: डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.
१९५४: बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७०: धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.
२०००: कलकत्ता शहराचे नाव कोलकता असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी
२००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.
२०१३: सलमान खान विरुद्ध १७ साक्षीदारांनी साक्ष नोदवल्यानंतर सत्र न्यायालयाने सलमान खान विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत, खटला सत्र न्यायालयात वर्ग केला.
२३ डिसेंबर – जन्म
१६९०: मणिपूर साम्राज्याचे सम्राट पामेबा यांचा जन्म.
१८५४: ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ हेन्री बी. गुप्पी यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९२६)
१८९७: ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार कविचंद्र कालिचरण पटनाईक यांचा जन्म.
१९०२: भारताचे ५ वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक चौधरी चरण सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १९८७)
२३ डिसेंबर- मृत्यू
१८३४: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १७६६)
१९२६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या. (जन्म: २ फेब्रुवारी १८५६)
१९६५: नट व गायक, गंधर्व नाटक मंडळी चे एक संस्थापक गणेश गोविंद तथा गणपतराव बोडस यांचे निधन. (जन्म: २ जुलै १८८०)
१९७९: हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार दत्ता कोरगावकर यांचे निधन.
१९९८: स्वातंत्र्यसैनिक रत्नाप्पा कुंभार यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९०९ – निमशिरगाव, शिरोळ, कोल्हापूर)
२०००: मलिका-ए-तरन्नुम म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १९२६ – कसुर, पंजाब, भारत)
२००४: भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री नरसिंह राव यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२१)
२००८: गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचे निधन. (जन्म: ३१ जानेवारी १९३१)
२०१०: केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री, युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट चे संस्थापक के. करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९१६)
२०१०: कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२८)
२०१३: एके ४७ रायफलचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९१९)
२०१३: भारतीय कवी आणि शिक्षक जी. एस. शिवारुद्रप्पा यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १९२६)