२४ एप्रिल – घटना – दिनविशेष
१६७४: भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.
१७१७: खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.
१८००: जगातील सर्वोत्तम ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेसची अमेरिकेत सुरवात.
१९६७: वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमीर कोमारोव्ह हे मरण पावणारे पहिले अंतराळवीर आहेत.
१९६८: मॉरिशस देशाचा संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) प्रवेश.
१९७०: गाम्बिया देश प्रजासत्ताक बनले.
१९९०: अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.
१९९३: इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.
२०१३: ढाका, बांगलादेश मध्ये इमारत कोसळून ११२९ जणांचा बळी गेला आणि २५०० जण जखमी झाले.
२४ एप्रिल – जन्म – दिनविशेष
१८८९: इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९५२)
१८९६: रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९८०)
१९१०: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७९)
१९२९: कन्नड चित्रपट अभिनेता व गायक राजकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल २००६)
१९४२: अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका बार्बारा स्ट्रायसँड यांचा जन्म.
१९७०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॅमियन फ्लेमिंग यांचा जन्म.
१९७३: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्म.
२४ एप्रिल – मृत्यू – दिनविशेष
१९४२: नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९००)
१९६०: नामवंत वकील लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर यांचे निधन.
१९७२: चित्रकार जामिनी रॉय यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८८७)
१९७४: देशभक्त तसेच हिंदी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९०८)
१९९४: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०३)
१९९९: चित्रपट कला दिग्दर्शक सुधेंदू रॉय यांचे निधन.
२०११: आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९२६)
२०१४: भारतीय राजकारणी शोभा नेगी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९६८)