२४ जुलै – घटना
१५६७: स्कॉटलंडची राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे १ वर्षाचा जेम्स (सहावा) स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला.
१७०४: ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला.
१८२३: चिलीमध्येे गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.
१९११: हायराम बिंगहॅम – ३रे यांनी पेरूतील माचुपिच्चू हे प्राचीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.
१९३१: पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.
१९४३: दुसरे महायुद्ध – ऑपरेशन गोमोरा – दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले.
१९६९: चंद्र मोहिमेनंतर अपोलो ११हे अंतराळयान पृथ्वीवर सुखरूप परतले.
१९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिर्चड निक्सनने स्वत:विरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.
१९९०: इराकने कुवेतच्या सीमेजवळ सैन्याची जमवाजमव करण्यास सुरूवात केली.
१९९१: अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
१९९७: बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९९७: माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.
१९९८: परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्यात आला.
२०००: विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईची विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम भारताची पहिला महिला ग्रँडमास्टर बनली.
२००१: टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत शिखा टंडनने फ्रीस्टाइल प्रकारात १०० मी. अंतर ५९.९६ सेकंदांत पार केले.
२००५: लान्स आर्मस्ट्राँगने टूर-डी-फ्रान्स ही सायकल शर्यत सलग सातव्यांदा जिंकली.
२४ जुलै – जन्म
१७८६: फ्रेंच गणितज्ञ संशोधक जोसेफ निकोलेट यांचा जन्म.
१८५१: जर्मन गणितज्ञ फ्रेडरिक शॉटकी यांचा जन्म.
१९११: हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म.
१९११: बासरीवादक संगीतकार अमलज्योती तथा पन्नालाल घोष यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९६०)
१९२८: गुजरातचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य केशुभाई पटेल यांचा जन्म.
१९३७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक मनोज कुमार यांचा जन्म.
१९४५: विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांचा जन्म.
१९४७: पाकिस्तानी फलंदाज जहीर अब्बास यांचा जन्म.
१९६९: अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका जेनिफर लोपेझ यांचा जन्म.
२४ जुलै – मृत्यू
११२९: जपानी सम्राट शिराकावा यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १०५३)
१९७०: भारतीय उद्योगपती पीटर दि नरोन्हा यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८९७)
१९७४: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १८९१)
१९८०: बंगाली हिंदी चित्रपट अभिनेते उत्तम कुमार यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९२७)
१९८०: इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १९२५)
२०१२: सीटी स्कॅन चे शोधक रॉबर्ट लिडले यांचे निधन. (जन्म: २८ जुन १९२