२४ जून – घटना
१४४१: इटन कॉलेजची स्थापना.
१७९३: फ्रान्समधील पपहिल्या प्रजासत्ताक घटनेचा अवलंब केला गेला.
१८८०: ओ कॅनडाचे हे गाणे कॅनडाचे राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले गेले.
१९३९: सयामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले.
१९४०: दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.
१९८२: कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड शिकविण्याची सक्ती.
१९९६: मायकेल जॉन्सनचा १९.६६ सेकंदांत २०० मीटर धावून विश्वविक्रम.
१९९८: अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर.
२००१: आय. एन. एस. विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकी करणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.
२०१०: जुलिया गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
२४ जून – जन्म
१८६२: रविकिरण मंडळाचे संस्थापक श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९७४)
१८७०: चार्ल्स रँड याची हत्या करणारे दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १८९८)
१८९३: द वॉल्ट डिस्नी कंपनी चे सह-संस्थापक रॉय ओ. डिस्नी यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९७१)
१८९७: ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडीत औंकारनाथ ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २९ डिसेंबर १९६७)
१८९९: मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा कोल्हापुर येथे जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७४)
१९०८: कथकली नर्तक गुरूगोपीनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९८७)
१९२७: तामिळ लेखक कवियरासू कन्नडासन यांचा जन्म.
१९२८: महाराष्ट्रातील लोकनेत्या मृणाल केशव गोरे यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै २०१२)
१९३७: ज्येष्ठ लेखिका अनिता मुजूमदार देसाई यांचा मसुरी येथे जन्म.
२४ जून – मृत्यू
१९०८: अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८३७)
१९१४: वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती यांचा गरुडेश्वर, बडोदा, गुजरात येथे निधन. (तारखेप्रमाणे)
१९९७: ओडिसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९४४)
२०१३: इटलीचे ४०वे पंतप्रधान एमिलियो कोलंबो यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९२०)