२४ नोव्हेंबर – घटना
१४३४: थेम्स नदी पूर्णपणे गोठली.
१७५०: महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद.
१८५९: चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पिशिज प्रकाशित केला.
१८६४: जळगाव नगरपालिकेची स्थापना.
१९४४: दुसरे महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१९६३: जॉन एफ. केनेडी यांचा खून करणाऱ्या ली. हार्वे ऑसवाल्ड याचा डॅलस पोलीस स्थानकात जॅक रुबी ने खून केला.
१९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले.
१९७१: डी. बी. कुपर याने चोरलेल्या २ लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.
१९७६: तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे निधन.
१९९२: कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर.
१९९२: वैज्ञानिक संशोधनासाठीचा जी. डी. बिर्ला पुरस्कार हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर.
१९९२: देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला कवी माधव पुरस्कार जाहीर.
१९९६: इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर.
१९९८: समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना प्रदान.
२०००: भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.
२४ नोव्हेंबर – जन्म
१८०६: रग्बी फुटबॉलचे निर्माते विल्यम वेबल एलिस यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १८७२)
१८७७: भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर कावसजी जमशेदजी पेटीगरा यांचा जन्म.
१८९४: इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७८)
१९१४: ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल २००३)
१९३७: मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म.
१९४१: भारतीय-इंग्लिश ड्रमर आणि गीतकार पेट बेस्ट यांचा जन्म.
१९५५: इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम यांचा जन्म.
१९६१: बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म.
२४ नोव्हेंबर – मृत्यु
१६७५: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १६२१)
१९१६: मॅक्सिम तोफेचे शोधक हिराम मॅक्सिम यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)
१९४८: मदर्स डे च्या संस्थापिका अॅन्ना जर्व्हिस यांचे निधन. (जन्म: १ मे १८६४)
१९६३: महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९००)
१९६३: राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी ली हार्वे ओस्वाल्ड यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९३९)
२००३: अभिनेत्री टुनटुन यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९२३)
२००४: जगप्रसिद्ध लेखक आर्थर हेली यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)
२०१४: भारतीय राजकारणी मुरली देवरा यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९३७)