25 December

0
208

25 December

२५ डिसेंबर – घटना

३३६: रोममध्ये पहिल्यांदा नाताळ साजरे करण्यात आले.

१९७६: आय. एन. एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील.

१९९०: वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी.

१९९१: मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

२५ डिसेंबर – जन्म

१६४२: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म. (मृत्यू: २० मार्च १७२७)

१८२१: अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका क्लारा बार्टन यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९१२)

१८६१: बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पण्डित मदन मोहन मालवीय यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९४६)

१८७६: पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल बॅ. मुहम्मद अली जिना यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९४८)

१८७८: शेवरले कंपनीचे सहसंस्थापक लुई शेवरोलेट यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९४१)

१८८९: रीडर डायजेस्टच्या सहसंस्थापिका लीला बेल वॉलेस यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९८४)

१९११: अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ बर्न होगार्थ यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९६ – पॅरिस, फ्रान्स)

१९१६: अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष अहमद बेन बेला यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल २०१२)

१९१८: इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते अन्वर सादात यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९८१)

१९१९: संगीतकार नौशाद अली यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे २००६)

१९२१: भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमिदुल्ला यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर २०००)

१९२४: भारताचे १० वे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांचा जन्म.

१९२६: हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार डॉ. धर्मवीर भारती यांचा जन्म. (मृत्यू: ४ सप्टेंबर १९९७)

१९२६: संसदपटू, फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस चित्त बसू यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९७)

१९२७: सुप्रसिद्ध सारंगीये पं. रामनारायण यांचा जन्म.

१९३२: व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार प्रभाकर जोग यांचा जन्म.

१९३६: भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते इस्माईल मर्चंट यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २००५)

१९४९: पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा जन्म.

१९५९: भारतीय कवी आणि राजकारणी रामदास आठवले यांचा जन्म.

२५ डिसेंबर – मृत्यू

१९४९: वॉर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक लिओन स्चलिंगर यांचे निधन. (जन्म: २० मे १८८४)

१९५७: साहित्यिक, विचारवंत व समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८८६)

१९७२: भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८७८)

१९७७: अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १८८९)

१९८९: रोमेनियाचे पहिले अध्यक्ष निकोला सीउसेस्कु यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९१८)

१९९४: भारताचे ७ वे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे निधन. (जन्म: ५ मे १९१६)

१९९५: अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते डीन मार्टिन यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१७)

१९९८: नाटककार व दिग्दर्शक दत्तात्रय गोविंद तथा दत्ता खेबुडकर यांचे निधन.