२५ जून – घटना
१९१८: कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.
१९३४: महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्न झाला.
१९४०: दुसरे महायुद्ध: फ्रांसने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले.
१९४७: द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली.
१९७५: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.
१९७५: मोझांबिकला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९८३: भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.
१९९३: किम कॅंपबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
२०००: मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले.
२५ जून – जन्म
१८६४: नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेर्न्स्ट यांचा जन्म.
१८६९: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांचा जन्म.
१९००: भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७९)
१९०३: इंग्लिश लेखक जॉर्ज ऑरवेल यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९५०)
१९०७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जे.हान्स डी. जेन्सेन यांचा जन्म.
१९११: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
१९१५: भारतीय लष्करी सल्लागार काश्मीर सिंग कटोच यांचा जन्म.
१९२४: संगीतकार मदन मोहन यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९७५)
१९२८: द स्मर्फ चे निर्माते पेओ यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९९२)
१९२८: नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह यांचा जन्म.
१९३१: भारतीय पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००८)
१९७४: हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा जन्म.
१९७५: रशियन बुद्धीबळपटू व्लादिमिर क्रामनिक यांचा जन्म.
१९७८: हिंदी चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी यांचा जन्म
१९८६: अभिनेत्री सई ताम्हनकर यांचा जन्म.
२५ जून – मृत्यू
१३४: डेन्मार्कचा राजा नील्स यांचे निधन.
१९२२: बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन.
१९७१: स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ जॉन बॉइडऑर यांचे निधन.
१९७९: मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब यांचे निधन.
१९९५: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन यांचे निधन.
१९९७: फ्रेंच संशोधक जॅक-इवेसकुस्तू यांचे निधन.
२०००: मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे यांचे निधन.
२००९: अमेरिकन गायक मायकेल जॅक्सन यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)