२६ डिसेंबर – घटना
१८९५: लुईस आणि ऑगस्ट लुइम यांनी तिकीट विक्री करून पहिल्या चित्रपटाचा पहिला शो पॅरिस येथे प्रदर्शित केला.
१८९८: मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.
१९७५: मॅक २ पेक्षा जोरात उडणारे जगातील पहिले व्यावसायिक सुपरसॉनिक टु – १४४ विमानसेवा सुरू झाली.
१९७६: कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.
१९८२: टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.
१९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.
१९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार.
२००४: ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण होऊन भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पडले.
२६ डिसेंबर – जन्म
१७८५: बेल्जियमचे पहिले पंतप्रधान एटिनी कॉन्स्टन्टाईन डी गर्लचा यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १८७१)
१७९१: इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ चार्ल्स बॅबेज यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १८७१)
१८९३: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९७६)
१९१४: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी २००८)
१९१४: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी २०००)
१९१७: साहित्यिक डॉ. प्रभाकर माचवे यांचा जन्म.
१९२५: शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक पं. कृष्णा गुंडोपंत तथा के. जी. गिंडे यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै १९९४)
१९३५: रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल आरोळे यांचा जन्म. (मृत्यू: २७ डिसेंबर १९९९)
१९४१: रंगभूमीवरील कलाकार लालन सारंग यांचा जन्म.
१९४८: डॉ. प्रकाश आमटे यांचा जन्म.
२६ डिसेंबर – मृत्यू
१५३०: पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १४८३)
१९७२: अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांचे निधन. (जन्म: ८ मे १८८४)
१९८९: व्यंगचित्रकार व लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९०२ – कायमकुलम, केरळ)
१९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९१८)
२०००: नाटककार आणि साहित्यिक प्रा. शंकर गोविंद साठे यांचे निधन.
२००६: अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९२१)
२०११: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री सरेकोपा बंगारप्पा यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९३३)