26 September

0
197

२६ सप्टेंबर – घटना

इ.स.पू. ४६: ज्युलियस सीझर यांनी आपल्या पौराणिक पूर्वज व्हिनस गेनेटिक्स यांना एक मंदिर अर्पण केले.

१७७७: अमेरिकन क्रांती – ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात घुसले.

१९०५: अल्बर्ट आइनस्टाइन यांनी सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतावरील पहिला लेख प्रकाशित केला.

१९१०: त्रावणकोर सरकारवर केलेल्या टीकेमुळे भारतीय पत्रकार स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई यांना अटक करून हद्दपार करण्यात आले.

१९५०: इंडोनेशियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९५४: जपानमध्ये तोया मारू ही फेरी वादळात बुडाली. १,१७२ लोक मृत्युमुखी.

१९६०: फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.

१९७३: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.

१९८४: युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.

१९९०: रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९७: गरुडा इंडोनेशियाचे विमान मेदान शहराजवळ कोसळले, २३४ लोक ठार.

२००१: सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक – संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.

२००९: टायफून केत्साना या चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपाईन्स, चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस व थायलंडमध्ये ७०० लोक मृत्युमुखी.

२६ सप्टेंबर – जन्म

१८२०: पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा बंगाल मध्ये जन्म. (मृत्यू: २९ जुलै १८९१)

१८४९: नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३६)

१८५८: लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १८९८)

१८७०: डेन्मार्कचा राजा क्रिस्चियन (दहावा) यांचा जन्म.

१८७६: भारतीय कवी, वकील, आणि राजकारणी गुलाम कबीर नैयरंग यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १८५२)

१८८८: अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते टी. एस. इलिय यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९६५)

१८९४: प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा मलकापूर कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९५५)

१९०९: नासकार चे संस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९९२)

१९१८: मिस वर्ल्ड चे संस्थापक एरिक मॉर्ली यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०००)

१९२३: भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक देव आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर २०११)

१९२७: गेटोरेडे चे सह-संशोधक रॉबर्ट कड यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००७)

१९३१: भारतीय क्रिकेट खेळाडू विजय मांजरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९८३)

१९३२: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म.

१९४३: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू इयान चॅपल यांचा जन्म.

१९७२: न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू मार्क हॅस्लाम यांचा जन्म.

१९८१: अमेरिकन टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्स यांचा जन्म.

२६ सप्टेंबर – मृत्यू

१९०२: लेव्ही स्ट्रॉस कंपनी चे संस्थापकलेवी स्ट्रॉस यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८२९)

१९५२: स्पॅनिश तत्त्वज्ञानी जॉर्ज सांतायाना यांचे निधन.

१९५६: भारतीय, मराठी उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २० जून १८६९)

१९७७: भारतीय नर्तक उदय शंकर यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १९००)

१९८८: रूद्रवीणा वादक शिवरामबुवा दिवेकर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १९१२)

१९८९: गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंतकुमार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९२०)

१९९६: मराठी नाटककार, पत्रकार विद्याधर गोखले यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९२४)

२००२: मराठी संगीतकार, गायक राम फाटक यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १९१७)

२००८: अमेरिकन अभिनेता पॉल न्यूमन यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९२५)