२७ ऑगस्ट – घटना
१९३९: सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन निर्मित Heinkel He 178 या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.
१९५७: मलेशियाची राज्यघटना अमलात आली.
१९६६: वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग.
१९९१: युरोपियन महासंघाने इस्टोनिया, लाटव्हिया लिथुआनिया या देशांच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.
१९९१: मोल्डोव्हाने सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
२७ ऑगस्ट – जन्म
१८५४: प्रख्यात कायदेपंडित, विद्वान राजकीय नेते दादासाहेब खापर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९३८)
१८५९: उद्योगपती व लोकहितबुद्धी सर दोराबजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९३२)
१८७७: रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रॉल्स यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १९१०)
१९०८: अमेरिकेचे ३६वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७३)
१९०८: ऑस्ट्रेलियन विक्रमवीर फलंदाज क्रमवीर सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी २००१)
१९१०: इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते सेतू माधवराव पगडी यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९४)
१९१६: रेंज रोव्हर चे सहरचनाकार गॉर्डन बाशफोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १९९१)
१९१९: संतसाहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल २०१३)
१९२५: रहस्यकथाकार नारायण धारप यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट २००८)
१९२५: भारतीय कवीजसवंत सिंग नेकी यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर २०१५)
१९३१: भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर २००७)
१९७२: मल्ल दिलीपसिंग राणा ऊर्फ ग्रेट खली यांचा जन्म.
१९८०: भारतीय अभिनेत्री नेहा धुपिया यांचा जन्म.
२७ ऑगस्ट – मृत्यू
१८७५: बॅंक ऑफ कॅलिफोर्निया चे संस्थापक विलियम चॅपमन राल्स्टन यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८२६)
१९५५: संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १८७९)
१९७६: हिंदी चित्रपटातील पार्श्वगायक मुकेश चंद माथूर तथा मुकेश यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९२३)
१९९५: भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते मधू मेहता यांचे निधन.
२०००: रंगभूमी, चित्रपट मालिकांतील अभिनेत्री मनोरमा वागळे यांचे निधन.
२००६: चित्रपट दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९२२)