28 August

0
165

२८ ऑगस्ट – घटना

१८४५: सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.

१९१६: पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानिया विरुद्ध युद्ध पुकारले.

१९१६: पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.

१९३१: फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.

१९३७: टोयोटा मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली.

१९९०: इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.

२८ ऑगस्ट – जन्म

१७४९: जर्मन महाकवी, कलाकार योहान वूल्फगाँग गटे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च १८३२)

१८९६: उर्दू शायर रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९८२)

१९०६: रंगभूमी अभिनेते चिंतामणी गोविंद तथा मामा पेंडसे यांचा जन्म.

१९१८: मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)

१९२८: भारतीय पदार्थवैज्ञानिक एम. जी. के. मेनन यांचा जन्म.

१९२८: सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च २००४)

१९३४: सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा सुजाता मनोहर यांचा जन्म.

१९३८: कॅनडाचे पंतप्रधान पॉल मार्टिन यांचा जन्म.

१९५४: भारतीय-इंग्लिश अर्थशास्त्री रवी कंबुर यांचा जन्म.

१९६५: पोकेमोन चे निर्माते सातोशी ताजीरी यांचा जन्म.

१९६६: माजी खासदार प्रिया दत्त यांचा जन्म.

२८ ऑगस्ट – मृत्यू

१६६७: जयपूर चे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १६११)

१९६९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन.

१९८४: इजिप्तचे पहिले राष्ट्रपती मुहम्मद नागुब यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९०१)

२००१: लेखक, चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९२७)