28 March

0
175

२८ मार्च – घटना

१७३७: बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.
१८५४: क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.
१९१०: हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.
१९३०: तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली.
१९४२: रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेन्डन्स लीग ची स्थापना केली.
१९७९: अमेरिकेतील थ्री माईल आयलंड या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.
१९९२: उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
१९९८: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्‌ड कॉम्प्युटिंग (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-१०००० हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला.

२८ मार्च – जन्म

१८६८: रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९३६)
१९२५: अभिनेता राजा गोसावी यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९८)
१९२७: भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या विना मझुमदार यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २०१३)
१९६८: इंग्लिश क्रिकेटपटू नासिर हुसैन यांचा जन्म.

२८ मार्च – मृत्यू

१९४१: ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८८२)
१९६९: अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक ड्वाईट आयसेनहॉवर यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १८९०)
१९९२: स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य सम्राट आनंदऋषीजी यांचे निधन.
२०००: शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख यांचे निधन.