28 May

0
161

२८ मे – घटना

१४९०: मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.
१९०७: पहिली आइल ऑफ मॅन टीटी रेस आयोजित करण्यात आली.
१९३७: नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
१९३७: फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी स्थापन झाली.
१९४०: दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९५२: ग्रीसमधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
१९५८: ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
१९६४: पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) ची स्थापना झाली.
१९९८: बलुचिस्तानच्या चगाई भागात पाकिस्तानने पाच यशस्वी अणूचाचण्या केल्या.
१९९९: इटली मध्ये लिओनार्डो दा विंची यांचे द लास्ट सपर हे चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.

२८ मे – जन्म

१६६०: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १७२७)
१८८३: क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६)
१९०३: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९९४)
१९०७: स्वातंत्र्यसेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९९४)
१९०८: दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चा जनक इयान फ्लेमिंग यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑगस्ट १९६४)
१९२१: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९५५)
१९२३: तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९९६)
१९४६: भारतीय कवी आणि समीक्षक के. सच्चिदानंदन यांचा जन्म.

२८ मे – मृत्यू

१७८७: ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक लिओपोल्ड मोत्झार्ट यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १७१९)
१९६१: प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १८९१)
१९८२: बळवंत दामोदर ऊर्फ कित्तेवाले निजामपूरकर यांचे निधन.
१९९४: हिंदूसभेचे नेते व पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे यांचे निधन.
१९९९: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते बी. विट्टालाचारी यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १९२०)