28 November

0
176

२८ नोव्हेंबर – घटना

१८२१: पनामाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९३८: प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.

१९६०: मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९६४: नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.

१९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.

१९७५: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले.

२०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.

२८ नोव्हेंबर – जन्म

१८५३: डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १९४४)

१८५७: स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १८८५)

१८७२: गायक नट रामकृष्णबुवा वझे यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे १९४३)

१९६४: भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी मायकल बेनेट यांचा जन्म.

२८ नोव्हेंबर – मृत्यू

१८९०: श्रेष्ठ समाजसुधारक जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८२७)

१८९३: ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८१४)

१९३९: बास्केटबॉल चे निर्माते जेम्स नेस्मिथ यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८६१)

१९५४: नोबेल पारितोषिक विजेते इटालियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९०१)

१९६२: गायक, संगीत संयोजक व अभिनेते कृष्ण चंद्र तथा के. सी. डे यांचे निधन.

१९६३: इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचे निधन. (जन्म: २५ मे १८९५)

१९६७: सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८८०)

१९६८: बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १८९७)

१९९९: अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक हनुमानप्रसाद मिश्रा यांचे निधन.

२००१: नाटक निर्माते अनंत काणे यांचे निधन.

२००८: भारतीय हवलदार गजेन्द्र सिंग यांचे निधन.

२००८: भारतीय सैनिक संदीप उन्नीकृष्णन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९७७)

२०१२: अमेरिकन लेखक झिग झॅगलर यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १९२६)