२९ जुलै – घटना
१८५२: पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्गाते म्हणून जोतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.
१८७६: फादर आयगेन, डॉ. महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची स्थापना केली.
१९२०: जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान सुरू झाली.
१९२१: अॅडॉल्फ हिटलर नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टीचे नेते बनले.
१९४६: टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया असे नामकरण झाले.
१९४८: १२ वर्षांच्या काळखंडानंतर लंडन येथे १४व्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या.
१९५७: इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना झाली.
१९८५: मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९८७: भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या करण्यात आल्या.
१९९७: हरनाम घोष कोलकाता, स्मृतिचिन्ह पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चित्रे या मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला.
२९ जुलै – जन्म
१८८३: इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १९४५)
१८९८: नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ इसिदोरआयझॅक राबी यांचा जन्म.
१९०४: जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा जन्म. भातीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३)
१९२२: लेखक आणि शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांचा जन्म.
१९२५: व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा जन्म.
१९३७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ डॅनियेल मॅकफॅडेन यांचा जन्म.
१९५३: भजन गायक अनुप जलोटा यांचा जन्म.
१९५९: हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्त यांचा जन्म.
१९८१: स्पॅनिश f१ रेस कार ड्रायव्हर फर्नांडो अलोन्सो यांचा जन्म.
२९ जुलै – मृत्यू
२३८: रोमन सम्राट बाल्बिनस यांचे निधन.
११०८: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन. (जन्म: २३ मे १०५२)
१८९१: पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे निधन.
११०८ : फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन.
१७८१: जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ योहान कीज यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १७१३)
१८९०: डच चित्रकार व्हिन्सेंटव्हॅन गॉग यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८५३)
१८९१: बंगाली समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८२०)
१९००: इटलीचा राजा उंबेर्तो पहिला यांचे निधन.
१९८७: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार बिभूतीभूशन मुखोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १८९४)
१९९४: नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डोरोथीक्रोफूट हॉजकिन यांचे निधन.
१९९६: स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९०९)
२००२: गायक व संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे निधन. (जन्म: २५ जुलै १९१९)
२००३: हिंदी चित्रपट विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९२६)
२००६: मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९२८)
२००९: जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचे निधन. (जन्म: २३ मे १९१९)
२०१३: भारतीय क्रिकेटरपटू मुनीर हुसेन यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९२९)