29 November

0
173

२९ नोव्हेंबर – घटना

१८७७: थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले.

१९४५: युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.

१९६३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन समिती नेमली.

१९७२: अटारी यांनी पोंग हा गेम प्रकाशित केला.

१९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.

२०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.

२०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

२९ नोव्हेंबर – जन्म

१८०३: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ क्रिस्चीयन डॉपलर यांचा जन्म.

१८४९: ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ सर जॉन अँब्रोझ फ्लेमिंग यांचा जन्म.

१८६९: समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९५१)

१८७४: नोबेल पारितोषिक विजेते सेरेब्रल एँजिओग्राफी तंत्राचे निर्माते अंतोनियो मोनिझ यांचा जन्म.

१९०७: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून २०००)

१९०८: तमिळ चित्रपट अभिनेता एन. एस. क्रिश्नन यांचा जन्म.

१९१९: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक जोई वीडर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१३)

१९२०: स्पॅनडेक्सचे निर्माते जोसेफ शेव्हर्स यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर २०१४)

१९२६: लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९६)

१९३२: फ्रान्सचे ३२ वे राष्ट्रपती जाक्स शिराक यांचा जन्म.

१९६३: भारतीय उद्योगपती ललित मोदी यांचा जन्म.

१९७७: पाकिस्तानी क्रिकेटपटू युनिस खान यांचा जन्म.

२९ नोव्हेंबर – मृत्यु

१९२६: ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, केरळ कोकिळ या मासिकाचे संस्थापक व संपादक कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे निधन.

१९३९: मराठी भाषेतील कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव ज्युलियन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८९४)

१९५०: महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी बाया कर्वे यांचे निधन.

१९५९: मराठी इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचे निधन. (जन्म: १७ मे १८६५)

१९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. (जन्म: २९ जुलै १९०४)

२००१: बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १९४३)

२०११: आसामी साहित्यिक व कवियत्री इंदिरा गोस्वामी यांचे निधन.