३ जुलै – घटना
१६०८: सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्वेबेक शहराची स्थापना केली.
१८५०: ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.
१८५२: महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.
१८५५: भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.
१८८४: डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.
१८८६: जर्मनीच्या कार्ल बेन्झ यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली.
१८९०: ओहायो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.
१९२८: लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण झाले.
१९३८: मॅलार्ड हे वाफेचे इंजिन ताशी २०२ किमी वेगाने धावले. वाफेच्या इंजिनाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.
१९९८: कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
२०००: विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता.
२००१: सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
२००६: एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.
३ जुलै – जन्म
१६८३: इंग्लिश कवी एडवर्ड यंग यांचे जन्म.
१८३८: पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १८९३)
१८८६: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक रामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९५७)
१९०९: कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ बॅरिस्टर व्ही. एम. तथा भाऊसाहेब तारकुंडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च २००४)
१९१२: मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७७)
१९१४: इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९९२)
१९१८:भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते व्ही. रंगारा राव यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १९७४)
१९२४: तामीळवंशीय राजकारणी, सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचे ६वे राष्ट्राध्यक्ष सेल्लप्पन रामनाथन यांचा जन्म.
१९२४: भारतीय क्रिकेटपटू अर्जुन नायडू यांचा जन्म.
१९२६: लेखिका स्वातंत्र्य सैनिक सुनीता देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९)
१९५१: न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू सररिचर्ड हॅडली यांचा जन्म.
१९५२: भारतीय गायक अमित कुमार यांचा जन्म.
१९५२: भारतीय कॅनेडियन लेखक रोहिनटन मिस्त्री यांचा जन्म.
१९७१: विकीलीक्स चे संस्थापक ज्युलियन असांज यांचा जन्म.
१९७६: झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू हेन्री ओलोंगा यांचा जन्म.
१९८०: भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा जन्म.
१९८७: युवसेना जिल्हाअधिकारी जळगाव माननीय प्रितेश ठाकूर यांचा जन्म.
३ जुलै – मृत्यू
१३५०: संत नामदेव यांनी समाधी घेतली. (जन्म: २९ ऑक्टोबर १२७०)
१९३३: अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचे निधन. (जम: १२ जुलै १८५२)
१९३५: सिट्रोएन कंपनीचे संस्थापक आंद्रे सीट्रोएन यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८७८)
१९६९: द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक ब्रायन जोन्स यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४२)
१९९६: हिंदी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२६)