३१ जुलै – घटना
१४९८: पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.
१६५७: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.
१६५८: औरंगजेब मुघल सम्राट बनला.
१८५६: न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्ट चर्चची स्थापना.
१९३७: के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.
१९५४: इटालियन गिर्यारोहकांनी के-२ (माउंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.
१९५६: कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला.
१९६४: रेंजर ७ अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.
१९९२: जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९२: सतार वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
२०००: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार प्रदान.
२००१: दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान.
२००६: फिदेल कॅस्ट्रो यांनी आपल्या भावाला, राऊल यांच्याकडे सत्ता हस्तगत केली.
२०१२: मायकेल फेल्प्स यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोडला.
३१ जुलै – जन्म
१७०४: स्विस गणिती गॅब्रिअल क्रॅमर यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १७५२)
१८००: जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८८२)
१८७२: संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार लक्ष्मणरामचंद्र पांगारकर यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९४१)
१८८०: हिन्दी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १९३६)
१८८६: अमेरिकन अॅनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बे यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९६५)
१९०२: व्यंगचित्रकार आणि लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९८९)
१९०७: प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून १९६६)
१९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमन यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६)
१९१८: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल २०००)
१९१९: भारतीय क्रिकेटपटू हेमू अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३)
१९४१: गुजरातचे माजी मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)
१९४७: हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा जन्म.
१९५४: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मनिवंनान यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून २०१३)
१९६५: हॅरी पॉटर च्या लेखिका जे. के. रोलिंग यांचा जन्म.
१९९२: आहारतज्ज्ञ श्रेया आढाव यांचा जन्म.
३१ जुलै – मृत्यू
१७५०: पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा) यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १६८९)
१८०५: भारतीय सैनिक धीरान चिन्नमलाई यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १७६५)
१८६५: आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)
१८७५: अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष अँड्रयू जॉन्सन यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १८०८)
१९४०: भारतीय कार्यकर्ते उधम सिंग यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८९९)
१९६८: चित्रकार, संस्कृत पंडित पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)
१९८०: पार्श्वगायक मोहंमद रफी यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १९२४ – कोटला सुलतान सिंग, पंजाब)
२०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक नबरुण भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: २३ जून १९४८)