4 January – दिनविशेष

0
216

आंतरराष्ट्रीय – ब्रेल दिन

घटना

१६४१: कर भरायला नकार देणार्‍या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हे हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये शिरले. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली. त्यात चार्ल्स यांचा पराभव होऊन मग त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.

१८४७: सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्हॉल्व्हर पिस्तुल विकले.

१८८५: आंत्रपुच्छ (appendix) काढुन टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. विल्यम डब्ल्यू. ग्रांट यांनी मेरी गार्टसाईड या रुग्णावर केली.

१८८१: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरु केले.

१९२६: क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.

१९३२: सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरू यांन दोन वर्षांची शिक्षा झाली.

१९४४: १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.

१९४८: ब्रम्हदेश (म्यानमार) देशाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९५२: ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.

१९५४: मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९५८: १९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.

१९५८: स्पुटनिक-१ हा पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर परत उतरला.

१९५९: रशियाचे लुना-१ हे अंतराळयान चंद्राजवळ पोहोचले.

१९६२: न्यूयॉर्क अमेरिका येथे पहिली चालकरहित रेल्वे सुरु झाली.

१९९६: साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या बिंब प्रतिबिंब या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.

२००४: नासाची मानवरहित स्पिरीट ही गाडी मंगळ ग्रहावर उतरली.

२०१०: बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्‍घाटन झाले.

जन्म

१६४३: इंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म.

१८०९: आंधळ्या व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतयार करणारे लुई ब्रेल यांचा जन्म.(मृत्यू: ६ जानेवारी १८५२)

१८१३: लघुलिपी म्हणजेच शॉर्टहँड तयार करणारे आयझॅक पिट्समन यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १८९७)

१९०९: मराठी नवसाहित्यिकार प्रभाकर पाध्ये यांचा जन्म.

१९१४: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी कवियत्री इंदिरा संत यांचा जन्म.(मृत्यू: १३ जुलै २०००)

१९२४: खासदार, नाटककार, लेखक, उर्दू शायर आणि संपादक विद्याधर गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९९६)

१९२५: हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेते प्रदीप कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २७ आक्टोबर २००१)

१९४०: मराठी कादंबरीकार श्रीकांत सिनकर यांचा जन्म.

१९४१: केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते कल्पनाथ राय यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९९)

मृत्यू

१७५२: स्विस गणिती गॅब्रिअल क्रॅमर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १७०४)

१८५१: दुसरे बाजीराव पेशवे यांचे निधन.

१९०७: गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचे निधन, सरस्वतीचंद्र हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म: २० ऑक्टोबर १८५५)

१९०८: विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत राजारामशास्त्री भागवत यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८५१)

१९६१: नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ आयर्विन श्रॉडिंगर यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८८७)

१९६५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन साहित्यिक टी. एस. इलियट यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८८८)

१९९४: सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट संगीतकार आर. डी. बर्मन तथा राहुल देव बर्मन तथा पंचमदा यांचे निधन. (जन्म: २७ जून १९३९)

२०१४: मृणाल दास (आयु ६६ वर्ष) भारतीय मजदूर नेता

२०१७: गायक बड़े फतेह अली खान (आयु ८२ वर्ष)