४ जून – घटना
१६७४: राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.
१८७६: ट्रान्सकाँटिनेन्टल एक्स्प्रेस रेल्वे अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.
१८७८: ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.
१८९६: हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.
१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याने रोम जिंकले.
१९७०: टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
१९७९: घानामधे लष्करी उठाव.
१९९३: आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.
१९९४: वेस्टइंडिजच्या ब्रायन लाराचा ८ डावांत ७ शतकांचा नवा विक्रम.
१९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९७: इन्सॅट-२डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.
२००१: नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.
४ जून – जन्म
१७३८: इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १८२०)
१९०४: भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)
१९१०: होव्हर्क्राफ्ट चे शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल्म यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १९९९)
१९१५: माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केएटा यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १९७७)
१९३६: चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९९१)
१९४६: दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म.
१९४७: विनोदी अभिनेता अशोक सराफ यांचा जन्म.
१९७४: भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर २०१२)
१९७५: अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली यांचा जन्म.
१९९०: भूतानची राणी जेत्सुनपेमा वांग्चुक यांचा जन्म.
४ जून – मृत्यू
१९४७: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७६)
१९६२: अमेरिकन निसर्गतज्ज्ञ चार्ल्स विल्यम बीब यांचे निधन.
१९९८: इतिहासतज्ज्ञ डॉ.अश्विन दासगुप्ता यांचे निधन.