5 August

0
156

५ ऑगस्ट – घटना

१८६१: अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.

१९१४: ओहायो मध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिगनल बसवले.

१९६२: नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.

१९६२: कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासार तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.

१९६५: पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.

१९९४: इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान.

१९९७: रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन सोयूझ-यू हे अंतराळयान मीर अंतराळस्थानकाकडे रवाना.

१९९७: फ्रेन्च खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्‍या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर.

५ ऑगस्ट – जन्म

१८५८: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९२४)

१८९०: इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७९)

१९३०: चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट २०१२)

१९३३: लेखिका व समीक्षिका विजया राजाध्यक्ष यांचा जन्म.

१९५०: भारतीय वकील आणि राजकारणी महेंद्र कर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २०१३)

१९६९: जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांचा जन्म.

१९७२: पाकिस्तानी जलदगती गोलंदाज अकिब जावेद यांचा जन्म.

१९७४: भारतीय अभिनेत्री काजोल यांचा जन्म.

१९८७: भारतीय अभिनेत्री जेनेलिया डिसोझा यांचा जन्म.

५ ऑगस्ट – मृत्यू

८८२: फ्रान्सचा राजा लुई (तिसरा) यांचे निधन.

१९६२: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्‍रो यांनी गोळी मारून आत्महत्या केली. (जन्म: १ जून १९२६)

१९८४: अभिनेता रिचर्ड बर्टन यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९२५)

१९९१: होंडा कंपनी चे स्थापक सुइचिरो होंडा यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १९०६)

१९९२: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९०५)

१९९७: स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते के. पी. आर. गोपालन यांचे निधन.

२०००: भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर लाला अमरनाथ भारद्वाज यांचे निधन.

२००१: गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्‍ना भोळे यांचे निधन. (जन्म: ११ मे १९१४)

२०१४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार चापमॅन पिंचर यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९१४)