5 December

0
172

५ डिसेंबर – घटना

१८४८: अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले.

१९०६: नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना.

१९३२: जर्मनीत जन्माला व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असणाऱ्या आल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकेचा व्हिसा.

१९४५: फ्लाईट १९, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाची ५ टी.बी. एम. ऍव्हेंजर विमाने स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोणात गायब झाली.

१९५७: इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.

१९८९: फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ किमी गती गाठून विश्वविक्रम केला.

२०१६: गौरव गिल यांनी २०१६ आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप किताब जिंकला.

५ डिसेंबर – जन्म

१८६३: फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९३३)

१८९४: ऊर्दू कवी जोश मलिहाबादी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९८२)

१८९६: नोबेल पारितोषिक विजेते शास्रज्ञ कार्ल कोरी यांचा जन्म.

१८९७: सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाईड व्हर्नन सेसेना यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९५४)

१८९८: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि अनुवादक जोश मलिहाबादी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९८२)

१९०१: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वेर्नर हायसेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी १९७६)

१९०१: अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, मिकी माऊस चे जनक वॉल्ट इलायन डिस्‍ने यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९६६)

१९०५: शेर-ए-कश्मीर शेख अब्दुल्ला यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८२)

१९२७: थायलँडचा राजा भुमिबोल अदुल्यतेज ऊर्फ राम (नववा) यांचा जन्म.

१९३१: १४ वे नौसेनाप्रमुख अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी यांचा जन्म.

१९४३: वर्‍हाड निघालंय लंडनला साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी २००९)

१९६५: भारतीय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचा जन्म.

१९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक रविश कुमार यांचा जन्म.

१९८५: भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांचा जन्म.

५ डिसेंबर – मृत्यू

१७९१: ऑस्ट्रियन शास्त्रीय संगीतकार वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १७५६)

१९२३: फ्रेंच चित्रकार क्लोद मोने यांचे निधन.

१९४६: प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांचे निधन.

१९५०: योगी अरविद घोष यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १८७२ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)

१९५१: चित्रकार अवनींद्रनाथ यांचे निधन. (जन्म: ७ ऑगस्ट १८७१)

१९५९: इंग्लंडचे क्रिकेटपटू कुमार श्री दुलीपसिंहजी यांचे निधन. यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (जन्म: १३ जून १९०५ – नवानगर, काठियावाड, गुजराथ)

१९७३: हिन्दी नाटककार राकेश मोहन यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९२५)

१९७३: रडार यंत्रणेचे शोधक रॉबर्ट वॉटसन-वॅट यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १८९२)

१९९१: संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले यांचे निधन.

१९९९: स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये यांचे निधन.

२००४: ब्राझिलियन फुटबॉलपटू ख्रिश्चन जुनियर यांचे सामना सुरु असताना बेंगलोर येथे निधन.

२००७: टीकाकार म. वा. धोंड यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९१४)

२०१३: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९१८)

२०१५: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किशनराव भुजंगराव राजूरकर यांचे निधन.

२०१६: तामिळ नाडू च्या मुख्यमंत्री जे. जयललिता उर्फ अम्मा यांचे तीव्र हृदयविकारानंतर निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४८)