6 May

0
191

६ मे – घटना – दिनविशेष

 

१५४२: सेंट फ्रान्सिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.
१६३२: शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.
१८१८: राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.
१८४०: पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले.
१८८९: पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले.
१९४९: ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु झाले.
१९५४: रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
१९८३: अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.
१९९४: इंग्लिश खाडी खालून जाण‍ाऱ्या आणि इंग्लंड फ्रान्स यांना जोडण‍ाऱ्या युरो टनेलचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस मित्राँ यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.
१९९७: बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.
१९९९: महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
२००१: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
२००२: भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२०१५: सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून, जामिनावर सुटका.

६ मे – जन्म – दिनविशेष

१८५६: ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९३९)
१८६१: मोतीलाल गंगाधर नेहरु भारतीय राजनीतीज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३१)
१९२०: जुन्या पिढीतील संगीतकार गायक बुलो सी. रानी यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९३ – मुंबई)
१९४०: प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ अबन मिस्त्री यांचा जन्म.
१९४३: लेखिका वीणा चंद्रकांत गावाणकर यांचा जन्म.
१९५१: भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका लीला सॅमसन यांचा जन्म.
१९५३: ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष टोनी ब्लेअर यांचा जन्म.

६ मे – मृत्यू – दिनविशेष

१५८९: अकबराच्या दरबारातील एक नवरत्‍न रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तानसेन येथे निधन.
१८६२: अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्‍री थोरो येथे निधन. (जन्म: १२ जुलै १८१७)
१९२२: सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांचे निधन.
१९४६: भुलाभाई देसाई राजनीतीज्ञ यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १८७७)
१९५२: इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ मारिया माँटेसरी यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १८७०)
१९६६: उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १८७६)
१९९५: प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आचार्य गोविंदराव गोसावी येथे निधन.
१९९९: पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य कृष्णाजी शंकर हिंगवे येथे निधन.
२००१: विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका मालतीबाई बेडेकर यांचे पुणे येथे निधन.