7 January – दिनविशेष

0
209

घटना

१६१०: गॅलेलिओ यांनी दुर्दार्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.

१६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.

१७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले.

१९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.

१९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.

१९३५: कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले.

१९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.

१९६८: अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.

१९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.

१९७८: एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्‍यांसह होनोलुलू जवळील महासागरात बेपत्ता झाली.

जन्म

१८९३: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म. (मृत्यू: २१ मे १९७९)

१९२०: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००८)

१९२१: अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २० जून २००८)

१९२५: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात यांचा जन्म.

१९४८: लेखिका सरोजिनी नायडू यांचा जन्म.

१९४८: विदुषी व लेखिका शोभा डे यांचा जन्म.

१९५०: हिंदी चित्रपटातील विनोदी कलाकार जॉनी लिव्हर यांचा जन्म.

१९६१: अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचा जन्म.

१९७९: हिंदी चित्रपट अभिनेत्री बिपाशा बासू यांचा जन्म.

मृत्यू

१९८९: दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचे निधन. (जन्म: २९ एप्रिल १९०१)

२०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे यांचे निधन.

२०१६: जम्मू काश्मीर चे मुख्यमंत्री मुफ़्ती मोहम्मद सईद यांचं निधन.