८ ऑगस्ट – घटना
१५०९: कृष्णदेव राय हे विजयनगर चे सम्राट बनले.
१९४२: क्रांतिदिन. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले.
१९४२: चले जाव चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
१६४८: स्वराज्याची पहिली लढाई – पुणे सातारा मार्गावरील खळत-बैलसरच्या लढाईत आदिलशहाचा सरदार फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी सपशेल पराभव केला.
१९०८: विलब राइट यांनी पहिले उड्डाण केले.
१९४२: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.
१९६३: इंग्लंडमधे १५ जणांच्या टोळीने रेल्वेवर दरोडा टाकुन २६ लाख पौन्ड पळवले.
१९६७: इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी ASEAN ची स्थापना केली.
१९८५: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.
१९९४: पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.
१९९८: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.
२०००: महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर.
२००८: चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
८ ऑगस्ट जन्म
१०७८: जपानी सम्राट होरिकावा यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट ११०७)
१८७९: अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस चे सहसंस्थापक डॉ. बॉब स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९५०)
१९०२: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९८४)
१९१२: जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९९८)
१९१२: कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००४)
१९२५: शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु पद्मश्री डॉ. वि. ग. भिडे यांचा जन्म.
१९२६: साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारती चे संपादक शंकर पाटील यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९४)
१९३२: अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक दादा कोंडके यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १९९८)
१९३४: भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक शरत पुजारी यांचा जन्म. (मृत्यू: १२ मे २०१४)
१९४०: क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै २००७)
१९५०: प्लेस्टेशन चे निर्माते केन कुटारगी यांचा जन्म.
१९५२: भारतीय क्रिकेटपटू सुधाकर राव यांचा जन्म.
१९६८: भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक ऍबे कुरिविला यांचा जन्म.
१९८१: स्विस लॉन टेनिस खेळाडू रॉजर फेडरर यांचा जन्म.
८ ऑगस्ट – मृत्यू
१८२७: ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १७७०)
१८९७: जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १८४८)
१९९८: लेखिका व कादंबरीकार डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांचे निधन.
१९९९: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार यांचे निधन.